बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज -ॲड. महेश भोकरीकर
![]()
बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज .
ॲड. महेश भोकरीकर
संस्कारीत शिक्षण आणि शाळा त्यासोबतच शिक्षकांची असणारी जबाबदारी ओळखत बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ तथा भोकरिकर लिगल फर्मचे प्रमुख महेश भोकरीकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. ॲड.भोकरीकर याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले, समाजात बाल गुन्हेगारींचे प्रमाण वाढत असताना याकडे समाजा सोबतच कौटुंबिक जबाबदारीची जाणीव पालकांनी ठेवणे महत्त्वाचे असून मोबाईल आणि आपल्या कामाच्या व्यापातून व्यस्ततेतून कौटुंबिक जिव्हाळा कसा निर्माण होईल याकडे अधिकाधिक लक्ष दिल्याशिवाय गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार नसल्या संदर्भात देखील त्यांनी मत व्यक्त केले याप्रसंगी भोकरीकर लीगल सर्विसेसच्या संचालिका ॲड. रूपाली भोकरीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेत राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी गौरवोदगार काढले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विचारमंचावर ॲड.रवी गुजराथी, ॲड.राजश्री गुजराती, ॲड. श्रेया चौरसिया, ॲड.मंगला पाटील, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, डी.जी. महाजन, दिनेश सावदेकर, रोहित बनसोडे, सागर सुतार, नवल कुंभार, पवन सोनार उपस्थित होते.कु. प्रज्ञा कापडणे ह्या विद्यार्थिनीस संविधानाची तोंड ओळख हे पुस्तक भेट देण्यात आले. विद्यार्थी विहार पाटील यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन स्वाती वाघुळदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जंगले, अतिथी परिचय सौ. सी.एस. टोके यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगला नारखेडे यांनी तर आभार श्रीमती अनिता पाटील यांनी मानले. विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्री स्वातंत्र्य, माझी आत्मकथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खानदेशातील भाषणे व वृत्तांत, डॉ. बाबासाहेब आणि भारतीय संविधान, जाती संस्थेचे उच्चाटन, भारतीय राज्यघटनेची तोंड ओळख हे ग्रंथ शाळेला भेट दिलेत.

