पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न……..
1 min read

पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न……..

Loading

पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त
धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न……..

अमळनेर प्रतिनिधी
धनगर समाज, मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने धरणगाव येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी माजी महापौर सदाशिव राव ढेकळे होते तर प्रमुख पाहुणे बन्सीलाल भागवत राज्य उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ व रवींद्र लाळगे जिल्हा अध्यक्ष मौर्य क्रांती संघ होते.कार्यक्रमाचे आयोजन मौर्य क्रांती संघ शहरप्रमुख पप्पू कंखरे,मौर्य क्रांती संघ धरणगाव तालुका अध्यक्ष निंबाजी कंखरे व जिल्हा सरचिटणीस मौर्य क्रांती संघ संतोष भडांगे यांनी केले होते.
समाज हितासाठी प्रत्येकाने योगदान देऊन समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी अल्पसा तरी प्रयत्न करावा असे आवाहन रवींद्र लाळगे यांनी केले तर समाजाची प्रगती करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन बन्सीलाल भागवत यांनी केले व रोजगार मेळावा साठी समाजाच्या घराघरात ‌पोहचले पाहिजे असे अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सदाशिव राव ढेकळे म्हणाले.सुरुवातीला पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संतोष भडांगे यांनी केले तर आभार निंबा कंखरे यांनी मानले तर मान्यवरांचे स्वागत शहरप्रमुख पप्पू कंखरे यांनी मनापासून केले. या प्रसंगी समाजसेवक नानासाहेब बोरसे, गोपीचंद सिरसाठ, दत्तात्रय गुरुजी, तेले सर,ॲडव्होकेट चंद्रकांत पारखे यांनी ही समाज प्रबोधनपर विचार व्यक्त केले.यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी पालक हजर होते. कार्यक्रमासाठी डी.एस.धनगर, आर.सी.भालेराव, वसंत भालेराव, सुरेश भालेराव, ज्ञानेश्वर रमेश पाटील व्यंकट किसन धनगर, विजय रमेश धनगर ,रमेश देव सिरसाठ, बळिराम धनगर, वाल्मिक बच्छाव, अमोल धनगर, गोपाल सोनवणे, समाधान धनगर, राजेंद्र बिर्हाडे,देविदास सोनवणे, महादू न्हाळदे,सम्राट सोनवणे,बापू धनगर, राजेंद्र धनगर, संजय धामोळे, योगराज धनगर गोपाल धनगर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *