1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महात्मा गांधी हिंदी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेमार्फत परीक्षा संपन्न

Loading

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे तर्फे आयोजित इयत्ता आठवीला हिंदी विभूषण परीक्षा, इयत्ता नववीला हिंदी विशारद परीक्षा, इयत्ता दहावीला हिंदी रत्न पारिक्षा आयोजित करण्यात आली.. परीक्षेमध्ये एकूण 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला..
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने दरवर्षी शाळेत विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. त्याच शाळेतील विद्यार्थी सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले. हिंदी परीक्षा प्रमुख आय आर महाजन यांनी परीक्षेचे नियोजन केले. तर शाळेचे शिक्षक एच.ओ माळी,अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन यांनी सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *