हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक आर.टी बागूल, ए.पी.चव्हाण यांचा सत्कार
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक आर.टी बागूल, ए.पी.चव्हाण यांचा
सत्कार
अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड व न्यू इंग्लिश स्कूल प्र डांगरी तालुका अमळनेर येथील राजेंद्र तुकाराम बागुल हे शिक्षक नुकतेच सेवानिवृत्त झाले व निम ता.अमळनेर येथील नंददीप माध्यमिक विद्यालय चे शिक्षक ए पी चव्हाण सेवानिवृत्त झाल्याबद्दल हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सहपत्निक सत्कार करण्यात आला..
ग्रामविकास शिक्षण मंडळ येथील शिक्षक आर टी बागुल यांनी मारवड, डांगरी येथे सेवा केली. होते 29 वर्षे 17 दिवस सेवा करून सेवानिवृत्त झाले.. नंददीप माध्यमिक विद्यालय निम तालुका अमळनेर येथील शिक्षक ए.पी. चव्हाण हे 29 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले दोघांचा सहपत्तीक सत्कार घडून आणला..
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान मंडळाचे तालुका अध्यक्ष डी के पाटील होते..
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांना भावी वाटचालीस देण्यात आल्या. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे असे विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डी के पाटील यांनी सांगितले..हिंदी अध्यापक मंडळ नेहमीच कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करीत पाठीवर प्रेरणादायी थाप ठेवण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे असेही त्यांनी सांगितले..
हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी व मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी
सांगितले की सेवानिवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घेऊन कुटुंबाला पूर्ण वेळ द्यावा असे सांगितले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी अध्यापक मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले..
शेवटी सेवानिवृत्त शिक्षक आर टी बागुल व ए.पी.चव्हाण सर यांनी हिंदी मंडळाचे धन्यवाद व्यक्त केले…

