चहार्डी ता.चोपडा येथे कृषीदूतांचे आगमन..
1 min read

चहार्डी ता.चोपडा येथे कृषीदूतांचे आगमन..

Loading

चहार्डी ता.चोपडा येथे कृषीदूतांचे आगमन

अमळनेर येथील नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी चहार्डी येथे शिक्षण व प्रात्यक्षिकासाठी आले असून त्यांचे ग्रामपंचायततर्फे स्वागत करण्यात आले.
हे विद्यार्थी पुढील चार महिन्यासाठी चहार्डी या गावात राहणार असून त्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड नियंत्रण, शासनाच्या विविध योजना, तसेच महिला बचत गट, इ पीक पाहणी अॅप आदी प्रकारच्या सर्व माहिती व नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे या विविध विषयी माहिती देण्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम घेणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप साळुंखे सर , व संबंधित विषयातील विषय विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली , अजय राजमाने, उज्वल पाटील, निखिल पाटील, व प्रशांत पाटील या गावात दाखल झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत चहार्डी व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *