कळमसरेची रिना माळी हिची स्पर्धा परीक्षा सरळसेवा अंतर्गत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड
1 min read

कळमसरेची रिना माळी हिची स्पर्धा परीक्षा सरळसेवा अंतर्गत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड

Loading

कळमसरेची रिना माळी हिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड

स्पर्धा परीक्षेत सरळ सेवा अंतर्गत निवड

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे ता. अमळनेर येथील
कु.रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी ता.चोपडा येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पदी निवड झाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कु. रिना माळी हिचे शिक्षण प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर इयत्ता दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण शारदा माध्यमिक विद्यालयात होऊन उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण प्रताप महाविद्यालयात झाले. रिना माळी हीने बी एस .सी व एम एस सी. मायकोबाँलायजी शिक्षण घेऊन धुळे येथील विदयासागर ईंनसट्युट येथे पी जी डी एम.एल टी करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु असतांना सरळ सेवा अंतर्गत डिसेंबर 2023 मध्ये ह्या पोस्टची परीक्षा तीने दिली होती. यात तीला यश मिळाले असून तिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया म्हणून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवड झाली आहे.
रिना ही मधुकर यशवंत माळी यांची कन्या आहे. तीने हे यश मिळविल्याने यावेळी तिचे वडील व आई यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. कु. रिना हिला तीचे काका एल आय सी एजंट बाबुलाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रिना माळी यांच्या या स्पर्धा परीक्षे अंतर्गत निवड झाल्याने मंत्री अनिल पाटील यांच्यासह तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *