दूरदृष्टी असलेला राजा राजर्षी शाहू महाराज – अजय भामरे
![]()
दूरदृष्टी असलेला राजा राजर्षी शाहू महाराज – अजय भामरे
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील सरस्वती विद्यालयात २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव समाधान शेलार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाहू महाराज एक दूरदृष्टी असलेले महान राजे होऊन गेले. ‘बहुजन हिताय -बहुजन सुखाय’ ही संकल्पना त्यांनी कृतीत आणली. शाहू महाराजांनी सामाजिक बंधुभाव, समता, बहुजन उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण ,शेती ,उद्योगधंदे ,कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अद्वितीय कार्य केले. महात्मा फुलेंनी लावलेल्या शिक्षणरपी रोपट्यास खतपाणी देऊन वाढविण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले.छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय पत्रकार अजय भामरे यांनी विद्यार्थ्यांना करून दिला.
याप्रसंगी धर्मा धनगर, ऋषिकेश महाळपूरकर , आनंदा पाटील, शितल पाटील, पुनम पाटील, संगीता पाटील, गीतांजली पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रणजीत शिंदे यांनी केले.

