जातीय सलोखा व सामाजिक न्याय देणारे शाहू महाराज!!-एस.एच भवरे
![]()
जातीय सलोखा व सामाजिक न्याय देणारे शाहू महाराज!!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहर हे पू. सखाराम महाराज व साने गुरूजींचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे सत्यशोधक चळवळीचे सुध्दा शहर म्हणून प्रसिध्द आहे. नाना पाटील ऊर्फ पत्री सरकार म्हणून ज्यांचा दरारा होता. अशा सत्यशोधक विचाराचे लिलाताई पाटील व उत्तमराव पाटील हे सामाजिक कार्यकर्ते होते. पुढे त्यांचे कार्य पाहुन साने गुरुजींनी त्यांना साथ दिली. स्वातंत्र्य काळापूर्वी डांगरी हे गाव चळवळीचे गाव होते. अमळनेरात पुरोगामी लोकांची मोठी फळी आहे. त्या कार्यकर्त्यांनी विद्रोही साहित्य घडवून आणले. अशाच उपक्रमात एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची भर मागच्या वर्षापासून पडली. तो उपक्रम म्हणजे 100 वक्ते तयार करून 100 शाळांमध्ये पाठविणे. महापुरुषाबाबत जनजागृती करणे. यंदा शाहू महाराजाच्या जयंती निमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान च्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. शारदा माध्यमिक विदयालय कळमसरे येथे शाहू महाराजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वक्ते बोलवून त्या वक्त्याच्या मार्गदर्शनातून कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची वक्ता होती स्नेहल शिसोदे ही गुणवान विद्यार्थीनी तिने आपल्या भाषणात शाहूंचे सामाजिक ,शैक्षणिक कार्य याबाबत सविस्तर विचार मांडले. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मंत्रमुग्ध केले. ती पण डांगरी गावची आहे. विचारात सत्यशोधक चळवळीचा वारसा दिसून आला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे शिक्षक एस. एच. भवरे यांनी मार्गदर्शन करतांना शाहू महाराजांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना शाहूची खरी प्रतिमा उलगडून दाखवली. शाळेचे मुख्याध्यापक डी.डी. जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन आर.जी. राठोड तर आभार व्ही. पी. महाजन यांनी मानले.

