रक्तातील सामाजिक बांधिलकी…रामेश्वरनगर परिसरातील असंख्य युवकांनी रक्तदान करुन मित्रांना वाहिली श्रद्धांजली
![]()
रक्तातील सामाजिक बांधिलकी…
रामेश्वर नगर परिसरातील असंख्य युवांनी रक्तदान करुन
वाहिली श्रद्धांजली

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांच्या टीमने एक सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदानाचे शिबिर आयोजित करीत मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे..
रक्तदान हे प्रत्यक्ष जीवनदान असून प्रत्येक पात्र व्यक्तीने ऐच्छिक रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे,कोरोणा महामारीत अन्नदानासाठी गेलेले रामेश्वर नगर भागातील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता रुषीकेश शेटे व विशाल पाटकरी अशी या युवकांची नावे अत्यंत दुःखद दुर्दैवी घटना झाली होती त्यांना आदराजंली रक्तदान शिबीर आयोजन करुन देण्यात आली. यावेळी अजमेरा रोटरी क्लब सेंटर धुळे यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी राकेश शेटे, प्रमोद पाटील , लोकेश शेटे , निलेश पाटील , उमेश शेटे , मुकेश पाटील , रुपेश बोरसे , गजानन थोरात , योगराज चौधरी , करण वाघ , पराग वाडे , भूषण निकम , निरज पाटील व मनिष महाजन सह अनेक युवांनी पहिल्यांदा रक्तदान केले या कार्याचे सर्वच स्थरातून कोतुक होत आहे. शिबीर प्रसंगी राकेश शेटे (समाज सेवक) , रक्तचळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे , प्रताप शिंपी , दादा पवार ,मा.नगरसेवक विक्रांत पाटील दिलीप ठाकूर यांचे मोलाचे योगदान लाभले.

