1 min read

मराठी कवितेत खान्देशचे योगदान लक्षवेधी

Loading

मराठी कवितेत खान्देशचे योगदान लक्षवेधी आहे.काव्यरत्नावली ते कविता-रती या कवितेच्या नियतकालिकांनी इतिहास घडवला आहे.केशवसुत ते उषा हिंगोणेकर असा प्रतिभाशाली प्रवास खान्देशच्या कवितेचा आहे.
खान्देशच्या कवींनी मराठी कवितेत स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे.या कवितेची दखल
महाराष्ट्र शासनानेही अधोरेखित केलेली आहे.महाराष्ट्र
शासनाने खान्देशातील आठ कवींना कवी केशवसुत हा पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.यात सर्वश्री.गणेश चौधरी,त्र्यंबक सपकाळे,पुरुषोत्तम पाटील,अनुराधा पाटील,उत्तम कोळगावकर,मनोहर जाधव,शशिकांत हिंगोणेकर आणि मंगेश नारायणराव काळे यांच्या
तृषार्त,सुरुंग,तळ्यातल्या साउल्या,तरीही,तळपाणी,तीव्र एकांततल्या जीर्ण काळोखात,ऋतुपर्व आणि मायावीये तहरीर या कलाकृतीना मराठी कवितेत मानाचे पान दिलेले आहे.या कलाकृतींची नोंद व्हावी,दस्ताऐवज व्हावा
अशी अभिलाषा प्रशांत पब्लिकेशन्स जळगावचे प्रकाशक रंगराव पाटील आणि प्रदीप पाटील यांनी मनोदय व्यक्त केला आणि डाॅ.आशुतोष पाटील संपादक
कविता-रती यांनी संपादनाची जबाबदारी स्वीकारली आणि साक्षेपी अशी प्रस्तावनाही लिहून दिली. आज कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी श्री.सुनिल पाटील यांच्या उपस्थितीत प्रकाशनपूर्व पहिली प्रत विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्राध्यापक डाॅ.आशुतोष पाटील यांनी "मातीत अजून ओल आहे"ही प्रकाशकांच्यातर्फे शशिकांत हिंगोणेकर यांचेकडून स्वीकारली. खान्देशच्या साहित्य प्रवासात हा अनोखा प्रयोग आहे.सन्मानीत पुस्तकातील प्रत्येकी १५कविता या संग्रहात समाविष्ट आहेत.या संपादनाने खान्देशच्या कवितेचे संशोधनासाठी नवे दालनच खुले झाले आहे.

खान्देशातील गेल्या ५०वर्षातील स्वतंत्र नामुद्रा असलेल्या कवींच्या कवितेचा अभ्यासाची संशोधकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.यात शंका नाही.रंगराव पाटील आणि संपादन करणारे डाॕ.आशुतोष पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *