1 min read

मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची खान्देशासह विदर्भात व्याख्याने

Loading

मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची खान्देशासह विदर्भात व्याख्याने
एरंडोल : खान्देशातील सुप्रसिद्ध वक्ते तथा महाराष्ट्राला परिचित असलेले कवी प्रा.वा. ना.आंधळे यांचे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधन्ण्याप्रित्यर्थ चला जाऊ कवितेच्या गावा याविषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन खान्देशासह विदर्भात करण्यात आलेले आहे.दि.२५ फेब्रुवारी२०२४ रोजी जळगाव येथील ख्यातकीर्त व.वा.सार्वजनिक वाचनालय येथे,दि.२६ फेब्रुवारी२०२४ रोजीअकोला येथील शंकरलाल खंडेलवाल अग्रवाल कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात तसेच दि२७ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संपन्न होत आहेत.
प्रा.आंधळे गेल्या चार दशकांपासून साहित्य लेखन करीत असून अनेक नामवंत व्याख्यानमालांमधून त्यांची व्याख्याने संपन्न झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *