श्री .जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा.वृक्षाली पाटील यांना पी.एच.डी प्रदान!
![]()

श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा.वृक्षाली पाटील यांना पी.एच.डी प्रदान!
ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी शहरातील कणेरी येथील प्रा.वृक्षाली विजयकुमार पाटील यांना नुकताच
श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारोहात झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन ,पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉक्टर सी.व्ही. आनंद बॉस व जे.जे.टी युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर विनोद टीब्रेवाला यांच्या शुभहस्ते विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारोहात मराठी साहित्यामध्ये नव साहित्यिक राजश्री बर्वे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन गेली पाच वर्ष संशोधन करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे, सध्या डॉ.वृक्षाली पाटील ह्या तुलसी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भिवंडी वुमन्स कॉलेज या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल व त्यांनी मराठी साहित्यामध्ये संशोधनाबद्दल मिळवलेली पीएचडी ही अभिमानास्पद आहे त्यामुळे त्यांचे धर्म सेवक तथा समाज कल्याण न्यास या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री.किशोर बळीराम पाटील यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

