1 min read

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,……

Loading

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,……

जळगाव दिनांक22/2/2024
जळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईड या संस्थेतर्फे आज रोजी जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस जागतिक चिंतन दिन जागतिक विचार दिन म्हणून साजरा करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाईड झेंडा फडकवून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्काऊट प्रशिक्षण आयुक्त श्री बी व्ही पवार सर होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहसचिव श्री डी एस सोनवणे सर स्काऊट संघटक श्री संजय बेलोरकर सर, गाईड संघटक हेमा वानखेडे, स्काऊट शिक्षक श्री गिरीश भावसार श्री किशोर पाटील सर. डॉ. व्ही एस पाटील सर प्रगती विद्यालय, अनुभुती विद्यालय, रावसाहेब रुपचंद विद्यालय, प. न. लुंकड कन्या शाळा येथील स्काऊट शिक्षक,गाईड कॅप्टन, स्काऊटगाईड विद्यार्थी विद्यार्थिनी,स्काऊट गाईड संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाईड संघटक हेमा वानखेडे यांनी जागतिक चिंतन दिनाची माहिती विशद केली
प्रथमतः लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्काऊट शिक्षक श्री गिरीश भावसार यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जीवन कार्याचा संपूर्ण इतिहास वर्णन करून सांगितला
डॉ. व्ही एस पाटील यांनी बेडन पॉवेल यांची माहिती सांगितली
अध्यक्ष भाषणात जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्री बी व्ही पवार सर यांनी स्काऊट गाईड संघटनेचे महत्त्व गोष्टी रूपाने सांगून लॉर्ड बेडन पावेल यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड संघटक हेमा वानखेडे यांनी केले.
स्काऊट संघटक श्री संजय बेलकर सर यांनी आभार प्रदर्शन केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *