व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
![]()



व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
दुर्गा फाउंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल रामवाडी या शाळेत विद्यार्थ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मावळ्यांच्या वेशभूषा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा घेऊन शाळेत हजेरी लावली होती यावेळी शाळेतून एक रॅली परिसरातून काढण्यात आली या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांनी चा वेश परिधान करून विविध विद्यार्थी पुढे चालत होते व चालत असताना सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला.
शाळेतील कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. अलका पवार यांनी विद्यार्थ्यांना छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींचा कार्यकाळ सांगितला. व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या प्रिन्सिपॉल वर्षा सोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे एक दूरदृष्टी असलेले राजे होते. आज प्रत्येकाने त्यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री उमाकांत पाटील उपस्थित होते. सूत्र संचालन मनीषा सोनार व स्वाती चव्हाण यांनी केले. योगिता फाळके, सुवर्णा पाटील, मनीषा शिरसाठ, संगीता पाटील, पल्लवी येवले, भारती गव्हाणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले त्यांना संस्थेच्या सचिव अलका पवार व प्रिसिपल वर्षा सोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

