1 min read

अमळनेर येथे छत्रपती नगर या ठिकाणी राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे सलग दुसऱ्या वर्षी शिवजयंती जल्लोषात साजरी

Loading

अमळनेर येथे छत्रपती नगर या ठिकाणी राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे सलग दुसऱ्या वर्षी शिवजयंती जल्लोषात साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) अखंड हिंदुस्थानाचे अराध्य दैवत विश्ववंदनीय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज छत्रपती नगर येथे राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे शिव जयंती गोड धोड वाटून, दिवे लावून व रांगोळ्या काढून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या प्रतिमेस येथील वरिष्ठ सदस्य श्री.चिंतामण सोनवणे यांनी सहपत्नी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.त्या नंतर श्री आर बी काटे यांनी श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाचे वंदन केले.त्यानंतर परिसरातील जमलेल्या सर्व शिव भक्तांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली व नंतर उपस्थित सर्व शिवभक्तांकडून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोशात महा आरती करण्यात आली.त्या नंतर राजे छत्रपती मित्र मंडळातील बाल सदस्य असलेल्या अजिंक्य सोनवणे, ओम खैरनार, गोपाल पाटील, आदी पाटील, सिद्धू साळुंखे, श्री चौधरी,रिशू साळुंखे, शिवांश काटे यांनी वेगवेगळ्या कला सादर केल्या.व या प्रकारे साखर वाटून ढोल ताशांच्या गजरात शिव जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य नेताजी पाटील, रमेश सूर्यवंशी, सुनील पाटील, नंदकिशोर पवार, निकुंभ सर, सुभाष शिंपी, हेमंत अहिरराव, प्रवीण सोनवणे,अजय साळुंखे, विकास पाटील, विकास चौधरी, संदीप खैरनार,दिपक काटे, जितेंद्र पाटील, सत्यम पाटील, रवी मोरे, किरण पाटील, विनोद पाटील,उमेश पाटील, दिनेश पाटील, निखिल सूर्यवंशी, शुभम सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सोनवणे आदी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मेहनत घेतली तर बालगोपाल यांच्या सह
सर्व महिला सदस्य यांची उपस्थिती मोठया संख्येने होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *