1 min read

जि.प.पिंगळवाडे शाळेतील मुलांना मिळाले बँकींगचे धडे…

Loading

जि.प.पिंगळवाडे शाळेतील मुलांना मिळाले बँकींगचे धडे…

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा आर्थिक साक्षरता उपक्रम…

आज दि.7 फेब्रु.2024 रोजी जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत “आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास” या विषयावर बँक ऑफ बडोदा निंभोरा शाखेचे शाखाधिकारी नितीन वसावे साहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने बचतीचे महत्व, पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकेचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादीबाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरीता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करतांना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या बँकेबद्दल माहितीच्या उत्सुकतेपोटी शाखाधिकारी नितीन वसावे साहेब यांनी बँकींग व्यवहाराचे प्रात्यक्षिकासाठी इ.5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकेत येण्यासाठी आमंत्रित केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग, उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रविण पाटील सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *