1 min read

डॉ रवींद्र भोळे महाराज यांच्या आरोग्य विषयक कार्याची शासनाने दखल घ्यावी

Loading

डॉ रवींद्र भोळे महाराज यांच्या आरोग्य विषयक कार्याची शासनाने दखल घ्यावी
उरुळी कांचन: हभप डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना गेली 35 वर्षे पासून ओळखत आहे. त्यांचे विविध क्षेत्रातील कार्य हे महान आहे. डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने ते अपंग, मूकबधिर, मतिमंद, निराधार व गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना, तसेच वाडी वस्तीवरील गरीब कुटुंबीयांना अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देत असतात. वेळप्रसंगी ते धर्मदाय , विनामूल्य वैद्यकिय सेवा करीत आहे.कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक साधुसंतांना , कामगारांना, कष्टकऱ्यांना वैद्यकिय मदत केलेली आहे, मोफत वैद्यकीय उपचार केलेले आहेत. अनेकांना आरोग्य विषयक सुविधा मिळण्यासाठी साठी मार्गदर्शन केलेले आहे. डॉ.रवींद्र भोळे महाराज वैद्यकीय सेवेत समर्पित भावनेने कार्य करित आहेत. तपस्वी डॉ.रवींद्र भोळे यांच्या आरोग्यविषयक सेवेची शासनाने दखल घ्यावी व त्यांच्या तपश्चर्येला फळ यावे,असे मत गुरुवर्य तात्या राम महाराज सोनारी गादी यांचे शिष्य भैरवनाथ भक्त नाथपंथी मोहन शिंदे महाराज यांनी येथे व्यक्त केले. महाराजांनी स्वयं स्फूर्तीने डॉक्टर रवींद्र भोळे यांना शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन, सन्मानित केले. याप्रसंगी नीती आयोग सलग्नितदीन बंधू व्यवसायिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नॉर्मल नॉर्टन, अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे, नितीन पारकर, सुदाम बडगुजर, डॉ. निनाद वायकोळे , डॉक्टर अभिषेक आहेर,यांचे सह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *