1 min read

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेमार्फत घेतली सगे सोयरे व्याख्यावर हरकत

Loading

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेमार्फत घेतली सगे सोयरे व्याख्यावर हरकत

शिंदे समिती घटनात्मक नाही, त्यांच्या शिफारशींवर उपस्थित केले प्रश्न

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – महाराष्ट्र शासनाने मराठा समाज आरक्षणांतर्गत ‘सगे सोयरे’ या धरतीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 26 जानेवारी 2024 ला अध्यादेशानुसार आश्र्वासित केले. सगे सोयरे या व्याख्येबाबत महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाजाने धरणगाव तालुक्यातर्फे हरकत नोंदविण्यासाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले.
मराठा समाजाला जरूर आरक्षण द्यावे याला आमचा विरोध नाही पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांना पोहचवा. असे प्रतिपादन विभागीय संघटक ज्ञानेश्वर महाजन तसेच महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष धनराज माळी सर यांनी केले.
निवेदनात राज्य शासनाने मराठा समाजाला सगे सोयरे या धर्तीवर कुणबी पत्र देण्याचे आश्र्वासित केले आहे यामुळे ओबीसी समाजात आपल्या हक्काचे आरक्षण जाईल अशी भीती आहे. शिवाय शिंदे समिती घटनात्मक नसतांना त्याच्या शिफारशी वरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे. राज्य शासनाने नियुक्त केलेले न्यायाधीश संदीप शिंदे समिती ही फक्त मर्यादित असून मागासवर्ग आयोग नाही.
मराठा (कुणबी) जात नोंदणीचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलेले नाही, तरीही समितीच्या शिफारशी वरून प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्र वितरीत करत आहे असे निवेदनात म्हटले आहे. हा ओबीसी समजावर अन्याय आहे.
निवेदन देतेवेळी विभागीय संघटक ज्ञानेश्वर महाजन, सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, माळी समाज अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, काँगेसचे तालुकाध्यक्ष डॉ.व्ही डी पाटील, माळी समाज उपाध्यक्ष निबाजी महाजन, शिवाजी देशमुख, गटनेते कैलास माळी सर, विजय महाजन, विलास महाजन, राजू ठाकरे, भागवत चौधरी, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, नाभिक समाजाचे अध्यक्ष आनंद फुलपगार , भावसार समाजाचे सुभाष भावसार, वाणी समाजाचे प्रशांत वाणी आणि विलास येवले, पप्पू कंखरे, चंद्रकांत भावसार, सलमान मन्सूर, कैलाश भारुडे, कैलास बारड, संजय चौधरी, कार्याध्यक्ष व्ही टी माळी सर , सचिव गोपाल माळी, मा.सभापती पूनीलाल महाजन,खत्री समाजाचे मनोज सुतारे रामचंद्र महाजन, रवींद्र माळी, अमोल महाजन, दीपक महाजन, गोरख देशमुख, सुनील चौधरी, भागवत चौधरी, डॉ नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, धनगर समाजाचे किशोर कंखरे , बाळू पाटील, मयूर देशमुख, ज्ञानेश्वर चौधरी , तुळशीराम माळी, साहेबराव जाधव, पिंटू महाजन, नंदलाल महाजन, संजय महाजन, गजानन महाजन, नरेंद्र महाजन, गोपीचंद बाविस्कर, प्रवीण महाजन, दिनेश महाजन, एच.डी.माळी, पी.डी.पाटील तसेच चौधरी, भावसार, सोनार, धोबी, माळी, खत्री, गुजर, नाभिक बागवान लोहार व इतर ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *