अंगणवाडी सेविका मदतनीसांना दोन हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये भाऊबीज भेट द्या- रामकृष्ण बी.पाटील यांची मागणी..

अंगणवाडी सेविका मदतनीसांना दोन हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये भाऊबीज भेट द्या- रामकृष्ण बी.पाटील यांची मागणी..
अमळनेर प्रतिनिधी
राज्यातील अंगणवाडी मदतनीसांना गेली अनेक वर्षे दिवाळीला दोन हजार भाऊबीज भेट राज्य सरकारकडून दिली जाते. परंतु दिवसागणिक महागाई वाढल्याने राज्य शासनाने भाऊबीज भेटीच्या रकमेमध्ये वाढ करणे अपेक्षित होते.
वाढणाऱ्या महागाईचा विचार करता शासनाने अंगणवाडी सेविका मदतनिसांना भाऊबीज भेट दोन हजार ऐवजी पाच करावी.
अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून युनियनच्या माध्यमातून सेविका मदतनीस करीत असून त्यासाठी लढे ही देत आहेत.
परंतु भाऊबीज भेटीच्या रकमेमध्ये यावर्षी ही शासनाने अपेक्षित वाढ केली नाही.म्हणून सेविका मदतनीसांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. म्हणून राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मागणीचा आणि महागाईचा गांभीर्याने विचार करून भाऊबीज भेटीच्या रकमेत वाढ करून ती पाच हजार करावी.
अशी आशयाची मागणी अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांनी शासनाकडे केली असल्याची माहिती दिली आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , ...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...