Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
खान्देश विशेष बातमी

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ! श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी घटस्थापना; उद्यापासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन

ईश्वर रामदास महाजन 10 Oct 2026, 14:45 1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 5 min read
🔧 साधने:
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!     श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी घटस्थापना; उद्यापासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी घटस्थापना; उद्यापासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन

अमळनेर प्रतिनिधी : विश्वातील एकमात्र अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत असलेल्या येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिशक्तीच्या आराधनेचा मंगलारंभ अर्थात नवरात्रोत्सवाला रविवार, दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजी घटस्थापनेने सुरूवात होत आहे. अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरूवात होणाऱ्या या पर्वात आध्यात्मिक चैतन्य, भक्ती आणि शक्तिउपासनेचा जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी हा उत्सव श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित केला जातो.

यंदा आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात मंगळ होरा या शुभ मुहूर्तावर श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील त्रिशुलात्मकस्थित भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांच्या मंदिरासमोर विधिवत घटस्थापना होऊन देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाणार आहे. यंदा तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमीने या उत्सवाची सांगता होईल.

दरम्यान, दहा दिवस चालणाऱ्या या धार्मिक विधींच्या काळात अमळनेरसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आज होणार घटस्थापना

रविवार, दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजी श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील त्रिशुलात्मक भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांचे मंदिर अत्यंत कलात्मकरित्या सजविण्यात आले आहे. तेथे सकाळी 9.30 वाजता विधिवत घटस्थापना होईल. घटस्थापना म्हणजे केवळ मातीच्या पात्रात धान्य पेरून कलशाची प्रतिष्ठापना करणे नव्हे, तर सृष्टीतील चैतन्यशक्तीचे आवाहन करण्याची आधात्मिक प्रक्रिया मानली जाते. कलश हा मांगल्य, समृद्धी आणि जीवनाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक आहे. त्यासमोर प्रज्वलित केलेली अखंड ज्योत श्रद्धेचा, ज्ञानाचा आणि अंतर्मनातील अज्ञान दूर करणाऱ्या प्रकाशाचा संदेश देते.

उद्यापासून दररोज श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन

सोमवार, दि. 12 ऑक्टोबर ते रविवार, 18 ऑक्टोबर 2026 दरम्यान दररोज सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन होईल. तसेच अमळनेर शहरातील महिला मंडळांतील माता-भगिनींच्या शुभ हस्ते सायंकाळी 6.30 वाजता सामूहिक आरती होईल.

19 ऑक्टोबर 2026 रोजी नवचंडी यज्ञ

सोमवार, दि. 19 ऑक्टोबर 2026 रोजी दोन सत्रांत नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 व द्वितीय सत्र दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान असेल. या काळात विशेष यजमानांच्या शुभ हस्ते विधिवत नवचंडी यज्ञ होऊन सायंकाळी पूर्णाहुती होईल.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीश्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत.. , विविध दुर्गा मित्र मंडळांच्या भक्तांचा हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास; मंगळ ग्रह देवाच्या चरणी ज्योत अर्पण करून नवरात्रोत्सवासाठी रवाना पुढील बातमी →धनगर समाजाचा १५ ऑक्टोबरला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा! ,आरक्षणाच्या मागणीसाठी खान्देशासह उत्तर महाराष्ट्रातील धनगर बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!