Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
खान्देश विशेष बातमी

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत.. , विविध दुर्गा मित्र मंडळांच्या भक्तांचा हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास; मंगळ ग्रह देवाच्या चरणी ज्योत अर्पण करून नवरात्रोत्सवासाठी रवाना

ईश्वर रामदास महाजन 10 Oct 2026, 14:37 1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:47 7 min read
🔧 साधने:
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत..   ,  विविध दुर्गा मित्र मंडळांच्या भक्तांचा हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास; मंगळ ग्रह देवाच्या चरणी ज्योत अर्पण करून नवरात्रोत्सवासाठी रवाना

अमळनेर प्रतिनिधी

: नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देशातील प्रसिद्ध देवीमातेच्या तीर्थक्षेत्रांतून अखंड ज्योत आपल्या गावात आणण्याची भक्तिमय परंपरा जपत विविध दुर्गा मित्र मंडळांचे भक्त दरवर्षी हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास करतात. या प्रवासादरम्यान अखंड तेवत ठेवलेल्या ज्योती श्री मंगळ ग्रह मंदिर, अमळनेर येथे आणून प्रथम श्री मंगळ ग्रह देवाच्या चरणी अर्पण केल्या जातात. यंदाही विविध मंडळांच्या अखंड दुर्गाज्योतींचे अमळनेरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.

**जामनेर, उमाळा आणि वाकडी येथील मंडळांचा सहभाग**

यामध्ये नवदुर्गा मित्र मंडळ, कापूसवाडी, जामनेर; जय बजरंग ग्रुप, उमाळा, जळगाव; तसेच महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर या मंडळांच्या भक्तांचा सहभाग होता. संबंधित मंडळांच्या माहितीनुसार, काही भक्तांनी पावागड, सावरियाशेठ, महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर यांनी तनोट माता मंदिर, भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या परिसरातील देवीस्थानांशी संबंधित मार्गाने ज्योत आणण्याचा संकल्प पूर्ण केला. काही मंडळांच्या भक्तांनी पावागडहून परतीच्या प्रवासात शहादा, नेरी आदी मार्गांवरून आपल्या गावाकडे प्रस्थान केले.

यातील महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर मंडळाने सुमारे १,२५० किलोमीटरचा प्रवास करत अखंड ज्योत आणली. या प्रवासात भक्तांनी ज्योत अखंड ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली. युवक भक्तांनी अनवाणी पायांनी धावत ज्योत घेऊन येत देवीमातेची आराधना करतात. श्रद्धा, निष्ठा आणि सामूहिक सेवाभावाचे दर्शन घडविणारी ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

**राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत; आशिष चौधरी यांच्या आरोग्य केंद्रात विश्रांती**

अमळनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून या दुर्गाज्योतींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शांतीभूषण ट्रेडर्स, पतंजली वितरक व आरोग्य केंद्र, कचेरी रोड, अमळनेर येथे आशिष भाऊ चौधरी यांच्या वतीने ज्योतींची विधिवत पूजा करण्यात आली. भक्तांना काही वेळ विश्रांती, चहा-नाश्ता आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर हे भक्त श्री मंगळ ग्रह मंदिराकडे रवाना झाले.

**श्री मंगळ ग्रह मंदिरात विधिवत पूजा आणि अखंड ज्योतींचे दर्शन**

श्री मंगळ ग्रह मंदिरात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. दिगंबर महाले सर, विविध विश्वस्त आणि मंगळ ग्रह सेवेकरी यांच्या उपस्थितीत या ज्योतींचे सहर्ष स्वागत करण्यात आले. मंदिरात ज्योतींची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. श्री मंगळ ग्रह देवाच्या चरणी ज्योत अर्पण करून देवदर्शन व मंदिर परिसरात प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर या अखंड ज्योती मंदिर परिसरात रात्रभर ठेवण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत पूजा आणि आरती करून पुढील प्रवासासाठी ज्योतींना निरोप देण्यात आला. मंदिराच्या वतीने आलेल्या सर्व भक्तांच्या निवासाची, महाप्रसादाची आणि आवश्यक सेवासुविधांची व्यवस्था करण्यात आली.

**हिंदू परंपरा आणि नवरात्र भक्तीचा जागर**

या परंपरेनुसार, गावात ज्योत पोहोचल्यानंतर तिचे स्वागत करून नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस पूजन केले जाते. अनेक कुटुंबांमध्ये घटस्थापना, देवीपूजन, उपवास आणि अन्य धार्मिक विधी श्रद्धेने केले जातात. अखंड ज्योतीच्या माध्यमातून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

अत्यंत कठीण प्रवास करून देवीमातेची अखंड ज्योत आपल्या गावात आणणाऱ्या या मंडळांच्या भक्तांच्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे श्री मंगळ ग्रह मंदिराच्या विश्वस्त मंडळाने कौतुक केले. मंदिराच्या वतीने सर्व भक्तांना सेवाभावाने प्रसाद देण्यात आला.

श्री मंगळ ग्रह मंदिराकडून दरवर्षी या भक्तांचे स्वागत करून त्यांच्या निवासाची, भोजनाची आणि अन्य आवश्यक व्यवस्थांची काळजी घेतली जाते. धार्मिक परंपरा, परस्पर सहकार्य आणि भक्तिभाव जपणारा हा उपक्रम नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात विशेष महत्त्व प्राप्त करतो.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीटीईटी अन्यायग्रस्त शिक्षकांना शासनाने न्याय द्यावा सर्व शिक्षक संघटनांची एकमुखी मागणी पुढील बातमी →आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ! श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी घटस्थापना; उद्यापासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!