सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ग्रॅच्युइटीसाठी निधी मंजूर करा , महिला व बालविकास विभागाचे सहसचिव विलास ठाकूर यांना निवेदन; जळगाव जिल्ह्यातील लाभार्थींसाठी सुमारे ८२ लाखांची मागणी

जळगांव प्रतिनिधी : सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करण्यासाठी शासनाने आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाचे सहसचिव श्री. विलास ठाकूर तसेच संबंधित कक्ष अधिकारी श्री. दत्तप्रकाश जाधव यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील शेकडो सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी रामकृष्ण बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२५ मध्ये न्यायालयात ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी दावे दाखल केले आहेत. त्यापैकी काही प्रकरणांची न्यायालयीन कार्यवाही पूर्ण होऊन संबंधित सेवानिवृत्त सेविका व मदतनीसांच्या बाजूने निकाल लागले आहेत.
न्यायालयाच्या निकालानुसार काही लाभार्थींना एक लाख रुपयांपासून साडेतीन लाख रुपयांपेक्षा अधिक ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचे आदेश झाले आहेत. त्यामुळे न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दावे दाखल केलेल्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांना देय असलेली सुमारे ८२ लाख रुपयांची ग्रॅच्युइटीची रक्कम शासनाने मंजूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी या प्रकरणातील न्यायालयीन निकाल, लाभार्थींची संख्या आणि देय ग्रॅच्युइटीची रक्कम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांना न्यायालयीन आदेशानुसार त्यांचा हक्काचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , ...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...