Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

कवितेमुळे पुनर्जन्म लाभला; म्हणूनच मी कवितेला आईच संबोधतो” कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची भावस्पर्शी भावना; चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ईश्वर रामदास महाजन 07 Oct 2026, 12:40 981 views अपडेटेड 25 Oct 2026, 11:35 7 min read
🔧 साधने:
कवितेमुळे पुनर्जन्म लाभला; म्हणूनच मी कवितेला आईच संबोधतो”    कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची भावस्पर्शी भावना; चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : “माझ्या आईच्या पोटी मी जन्मलो आणि जगाचे दर्शन झाले. ऐन तारुण्यात माझा कवितेच्या पोटी जन्म झाला आणि जग मला ओळखू लागले. आईने बोट धरून चालायला शिकवले, तर कवितेने बोट धरून बोलायला शिकवले. आई आशीर्वाद देताना ‘औक्षवंत हो’ म्हणायची, तर कविता आशीर्वाद देताना ‘मी तुला चिरंजीव करीन’ असे म्हणते. कवितेने मला भरभरून ओळख दिली. म्हणूनच मी तिला आईच संबोधतो,” अशी अत्यंत भावस्पर्शी भावना सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी व्यक्त केली.

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांच्या वतीने दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरी व आदिशक्ती संत मुक्ताई व्यासपीठावर उत्साहात संपन्न झाले. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराशेजारील भव्य सभागृहात झालेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. आंधळे बोलत होते.

संभाजीनगर येथील उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष बागल यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भव्य आणि दिव्य स्वरूपात पार पडले. संमेलनातील भव्य ग्रंथदिंडी सर्वांचे आकर्षण ठरली. यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना आदिशक्ती संत मुक्ताईकडून भव्य हार अर्पण करण्यात आला. हा सोहळा संमेलनाचे विशेष आकर्षण ठरला.

कवी संमेलनात कवितांचा बहारदार जागर

एरंडोल, जिल्हा जळगाव येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनाने रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथून आलेल्या कवी-कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

यावेळी व्यासपीठावर फाउंडेशनचे डॉ. मारुती गुरव, ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे, वासुदेव खोपडे, प्रा. डॉ. मंदा नांदुरकर, संजय ठोसर, कवी अशोक मोहिते, प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके, सौ. रूपाली चिंचोलकर, सौ. मेघा पाटील, प्रा. विनायक पाटील, जगन्नाथ बुडूखले गुरुजी, पांडुरंग दैवज्ञ, शंकरराव अनासुने, बाळु भाऊ इटणारे, कवी रामदास कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच नाशिक, जळगाव, भुसावळ, नांद्रा, एरंडोल, धाराशिव, शिरपूर, धुळे, बदलापूर, बुलढाणा, कोल्हापूर, लातूर, बेळगाव, पुणे आदी विविध ठिकाणांहून आलेल्या कवी-कवयित्रींनी कवी संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

“कवितेने जगण्याला मोल दिले”

प्रा. आंधळे यांनी आपल्या भाषणातून कवितेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “कविता जन्माला आली आणि जगण्याला मोल आले. दृष्टी आणि सृष्टी सुंदर झाली. कविता भेदाच्या पलीकडे नांदते आणि वयाच्या मर्यादाही तिला आड येत नाहीत. त्यामुळे जगाचे मातृपद कवितेकडे जाते.”

कवितेच्या सामर्थ्याचे विविध पैलू त्यांनी उदाहरणांसह रसिकांसमोर मांडले. त्यानंतर त्यांनी स्वतःची कविता सादर करताच सभागृहातून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट झाला.

उज्जैनकर फाउंडेशनच्या आयोजनाचे कौतुक

संमेलनाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करताना प्रा. आंधळे यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत विविध उपक्रमांनी आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या साहित्यिक-रसिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संमेलनाला विशेष रंगत आली.

या संमेलनाच्या यशाचे श्रेय उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जाते, असे सांगत त्यांनी संमेलनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रीती नंदलाल मोरे आणि नाशिक जिल्हा उपाध्यक्षा सौ. सारिका जोशी यांनी केले. साहित्य, कविता आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन संस्मरणीय ठरले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीखा. स्मिताताई वाघ यांनी आयोजित प्रदर्शनात तरुणाना उद्योगाच्या अनेक योजना मिळतील : मंत्री संजय सावकारे , प्रगतिशील महाराष्ट्र 2026 चे अमळनेरमध्ये थाटात उदघाटन , पहिल्या दिवशी चार हजार शालेय व माहाविद्यालयीन मुले, नागरिकांची भेट पुढील बातमी →सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ग्रॅच्युइटीसाठी निधी मंजूर करा , महिला व बालविकास विभागाचे सहसचिव विलास ठाकूर यांना निवेदन; जळगाव जिल्ह्यातील लाभार्थींसाठी सुमारे ८२ लाखांची मागणी

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!