पत्रकारिता व समाजकार्याची दखल; डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

पत्रकारिता व समाजकार्याची दखल; डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
कासोदा ता, एरंडोल प्रतिनिधी ): पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत तसेच समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करत असलेले डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी यांना ग्लोबल एकता मीडियाच्या वतीने ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी हे पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून ‘आरसा’ या सदरातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवर लेखन करीत आहेत. समाजातील प्रश्न केवळ मांडणे नव्हे, तर त्यातून जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखनातून दिसून येतो.
पत्रकारितेसोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे आणि गरजूंच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे, या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘आरसा’ या सदरातून समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या लेखणीचा हा सन्मान असून, पुरस्कारामुळे पत्रकारिता व समाजकार्याच्या क्षेत्रात कार्य करण्यास नवी ऊर्जा मिळाली आहे, अशी भावना डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या सन्मानाबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी ला...
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...