Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
राजकारण विशेष बातमी

पुणे शिक्षक मतदारसंघातून डॉ. प्रशम कोल्हे यांना उमेदवारी द्यावी – अनिल बोरनारे यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

ईश्वर रामदास महाजन 04 Oct 2026, 03:11 860 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:45 4 min read
🔧 साधने:
पुणे शिक्षक मतदारसंघातून डॉ. प्रशम कोल्हे यांना उमेदवारी द्यावी – अनिल बोरनारे यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) – आगामी पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने आणि प्रभावीपणे काम करणारे भाजप शिक्षक प्रकोष्ठाचे राज्य संयोजक डॉ. प्रशम कोल्हे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष तसेच भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.

या संदर्भात अनिल बोरनारे यांनी नुकतीच मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डॉ. प्रशम कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती केली. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊनही डॉ. कोल्हे यांना उमेदवारी देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल बोरनारे म्हणाले की, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये डॉ. प्रशम कोल्हे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षकांच्या सेवाविषयक अडचणी, भरती प्रक्रिया, पदोन्नती, अनुदान, शैक्षणिक धोरणे तसेच विविध प्रशासकीय प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.

शिक्षक संघटनांमध्ये सक्रिय सहभाग, शासन व प्रशासनाशी प्रभावी संवाद आणि शिक्षकांच्या हितासाठी सातत्यपूर्ण संघर्ष यामुळे डॉ. प्रशम कोल्हे यांनी पुणे विभागात विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते अत्यंत सक्षम आणि योग्य उमेदवार असल्याचे मत बोरनारे यांनी व्यक्त केले.

पुणे शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांमध्ये डॉ. कोल्हे यांच्याविषयी सकारात्मक वातावरण असून त्यांच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाला मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, शिक्षकांच्या प्रश्नांची सखोल जाण आणि संघटनात्मक कौशल्य यामुळे डॉ. कोल्हे यांना उमेदवारी दिल्यास शिक्षक वर्गाला प्रभावी नेतृत्व मिळेल, असे बोरनारे यांनी नमूद केले.

शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यभरातील शिक्षकांच्या अपेक्षा आणि भावना पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यात येत असून, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. प्रशम कोल्हे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक! पुढील बातमी →शिव टेकडी येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण उत्साहात पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ‘हरित अमळनेर’साठी वृक्षसंगोपनाचा संकल्प

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!