शिक्षण परिषदेत गुणवतेचा जागर : विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे विविध उपक्रम सादर,  विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हेच खरे निपुण महाराष्ट्र
1 min read

शिक्षण परिषदेत गुणवतेचा जागर : विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे विविध उपक्रम सादर, विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हेच खरे निपुण महाराष्ट्र

Loading

शिक्षण परिषदेत गुणवतेचा जागर : विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे विविध उपक्रम सादर

विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हेच खरे निपुण महाराष्ट्र घडविण्याचे ध्येय – दामिनी चौधरी गट शिक्षणाधिकारी

पारोळा प्रतिनिधी
वयाचे ६ वर्ष पूर्ण झालेले प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे . ते वयाच्या १४ वर्षापर्यंत शाळेत टिकले पाहिजे व त्याला दर्जेदार शिक्षण दिले गेलेच पाहिजे . हेच ” दाटिद ” धोरण प्रत्येक शाळा व शिक्षकाने समोर ठेवून विद्यार्थ्यांचा सार्वांगिण विकास साधणे व त्यातुनच भविष्यातील निपुण महाराष्ट्र घडेल असे प्रतिपादन नूतन गट शिक्षणाधिकारी दामिनी चौधरी यांनी शिक्षण परिषदेत भेट दिल्यावर शिक्षकांना मार्गदर्शन करतांना केले .
आज पारोळा केंद्र समुहाची पुष्प १ ले शिक्षण परिषद जि प उच्च प्राथ शाळा शेवगे बु ॥ ता पारोळा या शाळेवर आयोजित करण्यात आली होती . या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्र प्रमुख दिपक साळुंखे तर मार्गदर्शक म्हणून शिवाजी ठाकूर , अधिव्याख्याते डायट जळगाव व संतोष कढरे , तज्ञ शिक्षक व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते .
सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची चुणुक दाखविणारे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सादर केले . त्यातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देवून त्यांना शाळेत टिकवून गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे द्यावे याचा प्रत्यय आला .
या सर्व ३० विद्यार्थ्यांना जि प शाळा क्र ३ चे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी त्यांच्या पूज्य साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रमांर्तगत सुंदर रायटिंग पॅड मान्यवरांच्या हस्ते भेट देवून त्यांना प्रोत्साहन दिले .
मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले . माधुरी पवार , मधुकर पाटील व विजया पाटील यांनी निपुण महाराष्ट्र अभियानात शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम व अनुभव सुंदरपणे मांडले .
पालक शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय याबाबत मुख्याध्यापक अझर अब्दुल समद व स्मिता सोळंके यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले . डॉ जयंत नारळीकर गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम बाबत चतुर पवार व मनिषा मेश्राम यांनी .अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले .
गट शिक्षणाधिकारी दामिनी चौधरी यांनी प्रत्येक शाळेची निपुण विद्यार्थी टक्केवारी अढावा घेवुन ती वाढविण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले .
शिवाजी ठाकूर यांनी डायट निपुण महाराष्ट्र कार्यक्रम बाबत करीत असलेले प्रयत्न व गुणवत्ता कशी वाढविता येईल या बाबत सखोल चर्चा केली . संतोष कढरे यांनी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमात येणाऱ्या अडचणी व त्या कशा सोडवाव्यात या बाबत आपले विचार मांडले .
केंद्र प्रमुख दिपक साळुंखे यांनी सर्व प्रशासकिय कामे , विद्यार्थी उपस्थिती , विविध शैक्षणिक ॲपचा वापर , .गुणवत्ता वाढ , शापोआ स्वच्छता , आधार अपडेट करणे , विद्यार्थी सुरक्षा , व्यवस्थापन समिती पुर्नगठण , शालेय परिसरात हाय फॅट शुगर व मीठ असणाऱ्या अन्न पदार्थ विक्री बंदी अशा विषयांबाबत मार्गदर्शन केले .
ओंकार चव्हाण यांनी अतिशय सुंदर व काव्यात्मक सूत्रसंचलन व आभार मानले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *