सीमेवरील वीरांसाठी अमळनेरच्या लेकींची ‘राखीची सलामी’!  ,साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना पाठवल्या; ‘आनंददायी शनिवार’मधून देशप्रेम आणि सर्जनशीलतेचा जागर
1 min read

सीमेवरील वीरांसाठी अमळनेरच्या लेकींची ‘राखीची सलामी’! ,साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना पाठवल्या; ‘आनंददायी शनिवार’मधून देशप्रेम आणि सर्जनशीलतेचा जागर

Loading

सीमेवरील वीरांसाठी अमळनेरच्या लेकींची ‘राखीची सलामी’!

साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना पाठवल्या; ‘आनंददायी शनिवार’मधून देशप्रेम आणि सर्जनशीलतेचा जागर

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम साजरा करण्यात आला . त्या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे सचिव मा. दादासाहेब श्री. संदीप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते . व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम व शिक्षक वृंद उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती . अनिता बोरसे मॅडम यांनी आपल्या भाषणात सांगितले की आनंददायी शनिवार म्हणजे तुमचे मानसिक , सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे . तुमचे व्यवसायिक व संभाषण कौशल्य विकसित करणे . म्हणून आपल्या शाळेत हे उपक्रम साजरे करत असतो . ह्या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांसाठी स्वतः राख्या तयार केल्या व जवानांना पाठवल्या त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये देश प्रेम व नवनिर्मिती कौशल्य विकसित झाले शिक्षकांमधून श्री दिलीप पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब श्री संदीप घोरपडे यांनी रक्षाबंधन आपण महाभारता काळापासून साजरा करत आलो आहोत . त्याचप्रमाणे रक्षाबंधन सीमा बंधन विवाह बंधन या शब्दांचे अर्थ समजावून सांगितले विद्यार्थिनिंनी तयार केलेल्या सुंदर राख्यांचे कौतुक केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दिलीप पाटील सर , श्री मुकेश पाटील सर व श्री दीपक महाजन सर यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन श्री मुकेश पाटील सर यांनी केले व आभार श्री दिपक महाजन सर यांनी मानले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *