धरणगावात कानुबाई मातेचा उत्सव थाटा – माटात संपन्न !… ,खान्देशाची कुलदैवत कानुबाई माता : शिवाजी देशमुख ( उपाध्यक्ष – माळी समाज )
![]()
धरणगावात कानुबाई मातेचा उत्सव थाटा – माटात संपन्न !…
खान्देशाची कुलदैवत कानुबाई माता : शिवाजी देशमुख ( उपाध्यक्ष – माळी समाज )
धरणगाव प्रतिनिधी 🙁 पी डी पाटील)
धरणगांव – संपूर्ण धरणगाव शहरामध्ये खान्देशाची दैवत कानुबाई माता यांचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. रविवारी २३ ऑगस्ट २०२६ रोजी कानुबाई मातेची ठिक – ठिकाणी सर्व धर्मसमभाव या उक्तीप्रमाणे शहरातील विविध जाती – जमातींमध्ये कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली. लहान माळीवाडा पंच मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख तथा सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते तथा राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात कानुबाई मातेचे स्वागत करून स्थापना करण्यातआली. त्या आधी शनिवारी भाजी व भाकरी चे रोट करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी कानबाई मातेला पारंपारिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत सर्व कुटुंबातील भाऊबंद , आप्तेष्ट, नातलग परिवार यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शहरातील सर्वत्र नागरिकांनी कानबाई मातेची स्थापना केली होती त्या त्या घरी भेट देऊन आशिर्वाद घेतला.
दुसऱ्या दिवशी सोमवारी २४ ऑगस्ट २०२६ ला सकाळी ९ वाजेपासून कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली. ढोल – ताशा वाजून नाचत , फुगड्या खेळत मातेला निरोप देण्यासाठी संपूर्ण धरणगाव शहर एकवटले होते. यात सर्व जाती – धर्मातील लोकांनी एकत्र येऊन वाजत – गाजत खान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेला निरोप दिला. लहान माळीवाडा येथील शिवाजी देशमुख यांच्या घरापासून कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली. गबानंद चौक , लहान माळीवाडा माळी व पाटील समाज मढी मार्गे तेली तलाव येथे विसर्जन करण्यात आले.
याप्रसंगी माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील,पत्रकार कडू महाजन, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, रवींद्र देशमुख यासह शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




