पूरग्रस्तांच्या मदतीला जायन्ट्स ग्रुप; २०० नागरिकांची आरोग्य तपासणी , खारटेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य शिबिर; तपासणीसोबत औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन
1 min read

पूरग्रस्तांच्या मदतीला जायन्ट्स ग्रुप; २०० नागरिकांची आरोग्य तपासणी , खारटेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य शिबिर; तपासणीसोबत औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन

Loading

पूरग्रस्तांच्या मदतीला जायन्ट्स ग्रुप; २०० नागरिकांची आरोग्य तपासणी

खारटेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य शिबिर; तपासणीसोबत औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी : पूरस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रुबजी नगर येथील खारटेश्वर महादेव मंदिर परिसरात दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे २०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील यांनी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सूचना व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
शिबिराला जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील, युनिट ऑफिसर डॉ. सुनील पाटील, नगरसेविका रुपालीताई भोई, विलास शिवदे, पांडुरंग दोधू भोई, ग्रुपचे मार्गदर्शक प्रा. नानासो चंद्रकांत बडगुजर, उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र चौधरी, सदस्य महेश पाटील, खजिनदार राजेंद्र पाटील आणि सचिव संदीप महाजन यांच्यासह ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पूरस्थितीनंतर विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तपासणी, औषधोपचार आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे ठरते. ही गरज ओळखून जायन्ट्स ग्रुपने राबविलेल्या या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
‘आरोग्य तपासणी हीच खरी सेवा’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून जायन्ट्स ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपली. गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिबिराच्या आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी जायन्ट्स ग्रुपचे कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *