विजय महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास; अध्यक्षपदाची धुरा कायम , श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची २०२६-२७ ची कार्यकारिणी जाहीर
1 min read

विजय महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास; अध्यक्षपदाची धुरा कायम , श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची २०२६-२७ ची कार्यकारिणी जाहीर

Loading

विजय महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास; अध्यक्षपदाची धुरा कायम

श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची २०२६-२७ ची कार्यकारिणी जाहीर

अमळनेर प्रतिनिधी : श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. मंडळाच्या गणेशोत्सवाच्या नियोजनाला वेग देण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

मंडळाची सभा ज्येष्ठ सभासद प्रा. अँड. नागराज माळी सर, अँड. सुरेश सोनवणे, सुनील पाटील, अरविंद पाटील, निलेश महाजन, दिलीप महाजन, संजय महाजन व अशोक महाजन यांच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाचे नियोजन, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम तसेच उत्सवाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सलग चौथ्यांदा विजय महाजन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नाना महाजन यांची उपाध्यक्षपदी, तर योगेश दिलीप पाटील व जगदीश महाजन यांची सचिवपदी निवड झाली.

नूतन कार्यकारिणी

सदस्य : ज्ञानेश्वर मराठे, प्रशांत महाजन, दिनेश पाटील, दीपक महाजन, धनंजय बारी, निलेश महाजन, प्रदीप महाजन, नानू माळी, भावेश वाघ, प्रकाश मोरे, भूषण महाजन, मिलिंद महाजन, यश महाजन, सोनू वाघ, योगेश बारी व चेतन महाजन यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर सर्वांनी विश्वास व्यक्त करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारिणीचे क्षेत्रीय फुलमाळी समाजाचे अध्यक्ष दिलीप आत्माराम पाटील, सचिव विजय माळी, उपाध्यक्ष दिनेशबापू माळी तसेच सर्व विश्वस्त, समाजबांधव व मित्रपरिवाराने अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *