एकरुखीच्या विकासाला नवी दिशा; सुरेश पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव
![]()
एकरुखीच्या विकासाला नवी दिशा; सुरेश पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव
अमळनेर प्रतिनिधी
एकरुखी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी यांच्या एकजुटीचे दर्शन घडवत एकरुखीचे सरपंच श्रीयुत सुरेश विक्रम पाटील यांचा जिल्हा बँकेसाठीचा ठराव सर्वानुमते व बिनविरोध पारित करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या निर्णयासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री. रवींद्र पाटील, व्हाईस चेअरमन श्री. सुभाष पाटील, माजी सरपंच श्री. हिरामण पाटील, माजी सरपंच श्री. जितेंद्र पाटील, तसेच श्री. विठ्ठल पाटील, श्री. प्रियाला पाटील, श्री. आकाश पाटील, श्री. विपिन पाटील, श्री. किरण पाटील, श्री. भैय्या पाटील, श्री. मनोज पाटील, श्री. दिलीप नाना पाटील, सचिव श्री. संजय पाटील, तसेच श्री. गोविंदा भिल, श्री. दीपक नाईक, श्री. अजय नाईक, श्री. राजेंद्र नाईक, श्री. राहूल पाटील, श्री. मंगल नाईक यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक आणि तरुण मंडळींचे सहकार्य लाभले.
गावातील सर्व संबंधितांच्या एकमताने आणि परस्पर सहकार्याच्या भावनेतून हा ठराव बिनविरोध पारित झाल्याने एकरुखी गावातील एकजुटीची भावना अधोरेखित झाली आहे. ग्रामविकासाच्या विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि गावाच्या हितासाठी प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, या दृष्टीने या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
या ठरावासाठी श्री. जगन्नाथ चुडामण पाटील, श्री. संदीप पाटील आणि श्री. विश्वास पाटील यांचे विशेष व मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
एकमत, सहकार्य आणि ग्रामहिताचा निर्धार या भावनेतून झालेला हा निर्णय एकरुखीच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील एकजुटीचे उदाहरण ठरला आहे.

