पालक-शिक्षक मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार, मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रणासाठी पालकांना मार्गदर्शन; शाळा-पालक समन्वयातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” पालक-शिक्षक मेळावा ” उत्साहात संपन्न !
पालक-शिक्षक मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार
मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रणासाठी पालकांना मार्गदर्शन; शाळा-पालक समन्वयातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर
नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे सर)
दि. २४/०८/२०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे ” पालक-शिक्षक मेळावा ” उत्साहात संपन्न झाला. उपस्थित पालकांमधून सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्राम्हणवेल चे प्रतिष्ठित नागरिक आदिवासी समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व मा. शामराव मान्या चौधरी यांनी धुरा सांभाळली. संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम बळीराम माळी, उपाध्यक्षा सौ. हौसाताई तुकाराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, संचालक मंडळ सदस्य मा. नानासाहेब दगा गोविंदा महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी, जेष्ठ शिक्षक, कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री सुनिल ठाकरे व ग्रामस्थ पालकांमधून श्री. लहू पोपट देसाई, श्री. तुकाराम रामदास शेंडाळे, श्री. शिवा सुभाष ठाकरे, श्री. खंडू अर्जुन माळचे, श्री. अनिल देवचंद माळेचे, श्री. शरद जिभाऊ कोरे, श्री. प्रकाश जंगलू बागुल, सौ.. धनाबाई प्रकाश बागुल, श्री. नंदु महादू चौधरी, श्री. बबलू अशोक माळचे, श्री. देवा सुभाष ठाकरे, श्री. भिल्या गवल्या पवार, श्री. पंडित नामदेव चौधरी व असंख्य पालक बंधू भगिनी उपस्थित होते. उपस्थित सर्व पालकांचे इ. १० वी च्या विद्यार्थिनीं कु. भाग्यश्री शरद कोरे, कु. कामिनी सुर्यवंशी, कु.राशी गावीत, कु. हेमलता जव्हेरी, कु. लक्ष्मी बालू ठाकरे यांनी सामुहिक गायनातून सुमधुर गीत सादरीकरणाने स्वागत केले. तदनंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे संस्थेच्या वतीने, व शिक्षक शिक्षकेतर वृंदांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन, आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ यांनी केले. कार्यक्रमाचे फलक लेखन, सुत्रसंचलनातून पालक ग्रामस्थ यांच्या संबंधाचा आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षक समन्वय साधून विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कसे कटिबद्ध राहता येईल याचा स्पष्ट विचार मांडला. यावेळी पालकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आवाहन करण्यात आले. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापन व शिक्षकांशी हितगुज साधले. शाळा ग्रामीण आदिवासी विभागात असून नव्यान्नव टक्के आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या कमी असूनही विशेष परिश्रम घेतले बाबत पालकांनी समाधान व्यक्त केले. विविध प्रश्नांचे समाधान करण्यासाठी मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षकांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी डिजिटल युगात मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक प्रगतीसाठी करावा. पालकांनी याबाबतीत आपल्या पाल्यांना चांगल्या व वाईट कोणत्या गोष्टी आहेत. यातील फरक समजून पाल्यांना सजग करणे ही मोठी जबाबदारी पालकांनी पाळण्यास समज देण्यात आली. समाजात मोबाईलचा अति वापर किती घातक आहे याचे समुपदेशन करण्यात आले. मोबाईल आज डिजिटल युगात गरजेचे साधन बनले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपण स्वतः मोबाईलचा वापर गरजेपुरता केल्यास आपल्या पाल्यांना ही तशी सवय व सुसंस्कार व्हावेत यासाठी सतर्क राहावे. असे शिक्षकांच्या वतीने कार्यक्रमांतून आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांना व पालकांना संस्थेच्या वतीने अल्पोपहार व चहापान करून तोंड करण्यात आले. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद दिसला. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वी झाला.


वाह! आदरणीय संपादक साहेब अतिशय उत्कृष्ट बातमी प्रसिद्ध केली हृदयापासून प्रणाम! 🫡🫡🫡🌹🌹❤️❤️❤️