कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!
1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

नंदुरबार प्रतिनिधी
आज दि. १३/०८/२०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे साक्री ग्रामीण रुग्णालयातील मा. डॉ. अमोल मासुळे, मुख्य आरोग्य सेविका मा. सौ. वर्षा पटाईत, व औषध वितरण अधिकारी मा. किसन पावरा यांच्या सहकार्याने विद्यार्थी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना विविध आजारांवर औषधे वाटप करण्यात आली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी, जेष्ठ कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री . निकुंभ बी. एस., श्री. रविंद्र सुर्यवंशी, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते !

One thought on “कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

  1. वाह अतिशय सुंदर बातमी! 🌹🌹👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *