मोतीबिंदूवरील उपचारासाठी ८६ रुग्णांची पनवेलला होणार रवानगी , मंगळग्रह मंदिरातील शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी; गुरुवारी विशेष वाहनाने प्रवास
![]()
मोतीबिंदूवरील उपचारासाठी ८६ रुग्णांची पनवेलला होणार रवानगी
मंगळग्रह मंदिरातील शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी; गुरुवारी विशेष वाहनाने प्रवास
अमळनेर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात भव्य मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८६ रुग्ण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात अमळनेरसह धुळे, चोपडा, जळगाव, पारोळा, एरंडोल तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. विजय बामणे, डॉ. सुधीर फडतरे, डॉ. मोहसीन शेख, तसेच चोपडा येथील डॉ. राहुल चौधरी व भूपेंद्र वाघ यांनी रुग्णांची तपासणी केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले. मंदिराचे सेवेकरी मनोहर तायडे, कैलास महाजन, प्रमोद पाटील, भाऊसाहेब पाटील, किरण पाटील यांच्यासह सेवेकऱ्यांनी शिबिर यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले.
दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी शिबीर
गरजू रुग्णांना नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे शिबिर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे नियमितपणे आयोजित करण्यात येते. परिसरातील गरजू नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
चौकट..
शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्ण गुरुवारी पनवेलला रवाना होणार
शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ८६ रुग्णांना गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून विशेष वाहनातून पनवेल येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे. तेथे त्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था व पनवेल (जि. रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी.

