शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचित; सुनीता खडके जिल्हा महिला अध्यक्षा ,शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात संघटन विस्ताराला वेग
![]()
शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचित; सुनीता खडके जिल्हा महिला अध्यक्षा
शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात संघटन विस्ताराला वेग
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पवार व विभागीय अध्यक्ष संभाजी आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा. किशोरभाऊ दराडे यांच्या नेतृत्वाखाली सौ. सुनीता मिलिंद खडके यांची जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी तालुकाध्यक्षांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे संघटनेचे जाळे अधिक बळकट होणार असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय, वेतन, सेवा विषयक तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यास संघटनेला मोठी ताकद मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा. किशोरभाऊ दराडे तसेच माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्ह्याचे समन्वयक श्री. तुळशीराम सोनवणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटन विस्तारासाठी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष पुढीलप्रमाणे आहेत :
पाचोरा – श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील
धरणगाव – श्री. सुधाकर रामचंद्र पाटील
एरंडोल – श्री. राजेंद्र त्र्यंबक पाटील
पारोळा – श्री. रामकृष्ण मनसुख पाटील
जामनेर – श्री. गजानन एकनाथ पाटील
भडगाव – श्री. रोहन राजेंद्र परदेशी


जळगाव शहर – श्री. मयूर रावसाहेब पाटील
जळगाव ग्रामीण – श्री. सचिन दिलीप चव्हाण
भुसावळ – श्री. शरद चुडामन पाटील
रावेर – श्री. पंकज राजू पाटील
यावल – श्री. अमजद खान जबर खान
मुक्ताईनगर – श्री. दिलीप श्रीराम पाटील
चाळीसगाव – श्री. जहिरुद्दीन सिराजुद्दीन शेख
चोपडा – श्री. जगदीश आत्माराम पाठक
अमळनेर – श्री. राजेंद्र श्रीराम पाटील
बोदवड – श्री. मयूर अशोक सत्रे
जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सर्व नवनियुक्त तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुनीता मिलिंद खडके यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर सेनेचे सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


