“एकीच्या बळावर नव्या पर्वाची सुरुवात! जळगावात धनगर समाज कर्मचारी संघटनेचा संघटन संकल्प” , जिल्हास्तरीय बैठकीत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; संघटना विस्तार, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि समाजविकासाचा कृती आराखडा जाहीर
1 min read

“एकीच्या बळावर नव्या पर्वाची सुरुवात! जळगावात धनगर समाज कर्मचारी संघटनेचा संघटन संकल्प” , जिल्हास्तरीय बैठकीत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; संघटना विस्तार, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि समाजविकासाचा कृती आराखडा जाहीर

Loading

धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत संघटन विस्ताराचा निर्धार

जळगाव प्रतिनिधी

धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ व कर्मचारी संघटना, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा धनगर समाज कर्मचारी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, निमखेडी शिवार, चंदू अण्णा नगर चौक, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजातील ज्येष्ठ नेते पी. एस. सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून अरविंदभाऊ देशमुख, सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, प्रमिलाताई कंखरे (अध्यक्षा, अहिल्या महिला संघ), डी. बी. पांढरे, रमेश सुलताने, अरुण ठाकरे, सुभाष करे, दिलीप धनगर,विश्वनाथ धनके, रामचंद्र चराटे, धर्मा सोनवणे व पी. के. नायदे, डॉ. संजय पाटील, विकास मनोरे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, सुवर्णा धनगर, विनोद सावळे तसेच प्रा. विजय शिरसाट उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत समाजातील अधिकारी व कर्मचारी यांनी संघटित राहून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी यशवंत शिरोळे यांनी “संघटनेची दशा व दिशा” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच विश्वनाथ धनके, रामचंद्र चराटे, धर्मा सोनवणे व पी. के. नायदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष श्री. तुळशीराम तोताराम सोनवणे यांनी प्रास्ताविकातून कर्मचारी संघटनेची भूमिका, ध्येय-उद्दिष्टे आणि आगामी काळात जिल्हा व तालुका स्तरावर संघटनेचा विस्तार करण्याचा कृती आराखडा उपस्थितांसमोर मांडला. समाजातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला व युवक यांना एकाच व्यासपीठावर आणून सक्षम, प्रभावी व लोकाभिमुख संघटना उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत संघटनेचा विस्तार, आगामी कार्यकाळासाठी पदाधिकाऱ्यांची निवड, समाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मजबूत संघटन निर्माण करणे, युवक व महिला कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी भारतीय संरक्षण दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले वसिदास सोनवणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कर्मचारी अध्यक्षा भारती ठाकरे यांनी प्रभावीपणे केले, तर स्वाती पांढरे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व सर्व समाजबांधवांचे आभार मानले.

जिल्हाभरातील विविध शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

 

 

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल मनोरे, अनिल अहिरे, जी. बी. देशमुख, पांडुरंग पवार, महेंद्र सोनवणे, टी. बी. पांढरे, महेंद्र चौधरी, दत्तात्रय कंखरे, शरद धनगर, संतोष कचरे, राजू कंखरे, प्रवीण पवार, आनंद धनगर, प्रवीण धनगर, अरुण हडपे,दिपक देशमुख आणि तापीराम हिवराळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बैठकीचा समारोप “एकी हेच आपले सामर्थ्य… संघटन हीच आपली खरी ताकद!” या घोषवाक्याने उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *