शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार , अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
1 min read

शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार , अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

Loading

शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार

अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

जळगाव  प्रतिनिधी

शिवसेनेच्या उपनेतेपदी आदरणीय श्रीमती सरिता माळी-कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल आज, दि. २ ऑगस्ट रोजी जळगाव येथील अजिंठा रेस्ट हाऊस येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील (माजी सभापती, पंचायत समिती अमळनेर), जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ भाऊ पाटील, रावसाहेब दादा शिरसाट (आदिवासी कोळी समाज जिल्हाध्यक्ष, जळगाव), आर. डी. आबा कोळी, सामाजिक कार्यकर्ते संदीप सर शिरसाट तसेच रवींद्र शिरसाट यांनी श्रीमती सरिता माळी-कोल्हे यांचा सत्कार करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

उपस्थित मान्यवरांनी श्रीमती माळी-कोल्हे यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करत, शिवसेनेतील त्यांच्या नव्या जबाबदारीमुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमात उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सत्कार समारंभाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *