अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेस सेवादल मैदानात ,अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पंचनामे व भरपाईसाठी प्रशासनाला निवेदन देणार
![]()
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेस सेवादल मैदानात
अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पंचनामे व भरपाईसाठी प्रशासनाला निवेदन देणार
अमळनेर : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून काही घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय काँग्रेस सेवादलाच्या वतीने घेण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर तहसील कार्यालयाजवळ सर्वांनी एकत्र जमावे. त्यानंतर सर्वानुमते अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यात येणार आहे.
पाहणीनंतर सोमवारी तहसीलदार, प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या पाहणी मोहिमेत काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष बन्सीलाल आसाराम भागवत व शहराध्यक्ष भिकाजी रामचंद्र पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

