खवशीत आज कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. वासुदेव देसले यांचा भव्य नागरी सत्कार , सेवानिवृत्तीचा गौरव, सौ. सुष्माताई देसले यांच्या संचालकपदी निवडीचा सन्मान; शिष्यवृत्ती परीक्षेतील तालुक्यातील प्रथम क्रमांक विजेता कार्तिक मराठेचाही होणार गौरव
![]()
खवशीत आज कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. वासुदेव देसले यांचा भव्य नागरी सत्कार
सेवानिवृत्तीचा गौरव, सौ. सुष्माताई देसले यांच्या संचालकपदी निवडीचा सन्मान; शिष्यवृत्ती परीक्षेतील तालुक्यातील प्रथम क्रमांक विजेता कार्तिक मराठेचाही होणार गौरव
अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार)
खवशी (ता. अमळनेर) येथे आज (दि. २८ जुलै) सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत चौक, दत्त मंदिर ओटा येथे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. वासुदेव वत्सला रामभाऊ देसले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. देसले यांनी पोलीस उपअधीक्षक, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) या पदावर उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर नुकतीच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे.
याच कार्यक्रमात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुष्माताई देसले यांची शेतकी संघाच्या संचालकपदी झालेल्या निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गावातील गुणवंत विद्यार्थी कार्तिक राकेश मराठे याने शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचाही नागरी गौरव केला जाणार आहे.
समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

