विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर बाळद पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न”*
![]()
*“विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर बाळद पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न”*
प्रतिनिधी ,
चोपडा जि.जळगाव
हातेड बु. (ता. चोपडा) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सद्गुरू शंकरबाबा पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आपल्या आदर्श गाव हातेड बु. ते श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर, बाळद असा पायी प्रवास मोठ्या भक्तिभावात व उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला. ह.भ.प. दिंडी चालक अनिल दिनकर सोनवणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यात गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दिंडीदरम्यान भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर, भजन व भक्तीमय वातावरणात पायी वारीचा आनंद घेतला. सर्व भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता आले. विठ्ठल नामात तल्लीन होऊन भाविकांनी अत्यंत आनंदाने आणि उत्साहात या वारीचा अनुभव घेतला.
या पायी दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग तसेच श्रीराम भजनी मंडळ, हातेड बु. यांच्या सहकार्याचा विशेष वाटा राहिला. नियोजन, भाविकांची व्यवस्था आणि संपूर्ण वारी यशस्वी करण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हा भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला.
या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या ह.भ.प. दिंडी चालक अनिल दिनकर सोनवणे, श्रीराम भजनी मंडळ हातेड बु. तसेच सर्व ग्रामस्थ व तरुण वर्गाचे आयोजकांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

