आषाढीच्या पावन पर्वावर रक्तदानाचा महायज्ञ; जायन्ट्स ग्रुपची समाजसेवेची अनोखी परंपरा
![]()
आषाढीच्या पावन पर्वावर रक्तदानाचा महायज्ञ; जायन्ट्स ग्रुपची समाजसेवेची अनोखी परंपरा
अमळनेर प्रतिनिधी
संत श्री सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिराला शनिवार रोजी सकाळी 8.00 वाजता सुरवात झाली तर दु 4.00 ते 6.00 आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात असंख्य अबाल रुद्ध रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. आरोग्य निदान डॉ सुमित सूर्यवंशी: अस्थीरोग तज्ञ्,डॉ जितेंद्र बिऱ्हाडे:बालरोग तज्ञ्,डॉ सोनल महाजन:स्त्री रोग तज्ञ्, डॉ निलेश शिंगाणे:दंत रोग तज्ञ्, या विविध आरोग्य सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी झाली .तसेच जीवनश्री ब्लड सेंटर चे संतोष वाघ व संपूर्ण टीम यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जायँट्स वेलफेयर फौंडेशन फेडरेशन 2अ अध्यक्ष श्री. भिमलिंग लिंभारे, फेडरेशन सल्लगार श्री. चंद्रकांत जाधव, फेडरेशन डायरेक्टर श्री. श्रीराम सोनवणे, फेडरेशन ऑफिसर श्री. मनोज भावसार यांनी उपस्थिती दिली.
फेडरेशन सल्लगार श्री. चंद्रकांत जाधव यांनी अमळनेर येथील जायन्ट्स ग्रुपच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन ग्रुप च्या कार्याबद्दल कौतुक केले. तसेच अध्यक्ष श्री. भिमलिंग लिंभारे यांनी
ग्रुप च्या पुढील वाचलीस शुभेच्छा देऊन आयोजित उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ सुनील पाटील यांची फेडरेशन 2A चे युनिट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या उपक्रमासाठी जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते , अध्यक्ष डॉ. महेश रमण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला . यावेळी ग्रुपचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा चंदूलाल बडगुजर, प्रा पी आर भावसार,ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील पाटील, उपाध्यक्ष अँड राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र भावसार सर खजिनदार राजेंद्र पाटील सर,महेश पाटील, संजय मुंडके, संतोष वाघ व अबाल वृद्ध नागरिक उपस्थित होते.


