शिक्षणासाठी हातभार, समाजासाठी आदर्श , अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त ४२५ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
1 min read

शिक्षणासाठी हातभार, समाजासाठी आदर्श , अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त ४२५ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

Loading

शिक्षणासाठी हातभार, समाजासाठी आदर्श

अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त ४२५ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

अमळनेर, प्रतिनिधी : भारतातील ज्येष्ठ उद्योगपती व विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेसच्या सभागृहात सुनील भाऊ चौधरी मित्रपरिवाराच्या वतीने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विविध विद्यालयांतील ४२५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विजय बग्जिलेवाले (जनरल मॅनेजर, विप्रो अमळनेर), जितेंद्र कुमार शर्मा (सीनियर क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, विप्रो अमळनेर), किरण निकम (प्रमुख, एचआर विभाग, विप्रो अमळनेर), हॉटेल उदय उद्योग समूहाचे संस्थापक राजाराम वामन चौधरी तसेच उद्योजक विजय माहेश्वरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील राजाराम चौधरी, रवींद्र देशमुख, सुनील माहेश्वरी, एल. डी. बरु, महेंद्र कोठारी, सुरेश पाटील, शेखर धनगर, धनराज चौधरी, अमळगाव ग्रा प सदस्य संजय चौधरी गौरव चौधरी, शुभम चौधरी तसेच संपूर्ण चौधरी परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण सुरेश चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र महाले सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमास विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
विप्रो हा अत्यंत मोठा उद्योग समूह आहे त्याच्या मातृ प्रकल्प हा अमळनेर मध्ये आहे अमळनेरच्या जळणघळणीमध्ये विप्रो चा मोठा वाटा आहे त्यामुळे कुठल्याही हेतू शिवाय आम्ही दरवर्षी विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो
सुनील राजाराम चौधरी
उद्योजक अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *