‘विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पर्ल इंटरनॅशनल स्कूल; आषाढी एकादशीची दिंडी ठरली भक्तीचा अविस्मरणीय सोहळा’
![]()
*पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा*
तालुका प्रतिनिधी
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम प्राचार्या सौ गायत्री भदाणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्राचार्या सौ गायत्री भदाणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय म्हणजे काय ते समजून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा केल्या होत्या. शाळेच्या पटांगणात दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन फुगड्या खेळण्यात आल्या पालखी भोवती रिंगण सोहळा करण्यात आला. व पालखी मिरवणूक श्रीकृष्ण कॉलनी मधुन काढण्यात आली.
विविध ठिकाणी पालखीमध्ये असलेले विठ्ठल रुक्मिणीची पुजा करण्यात आली.शेवटी पालखी शाळेच्या पटांगणात येवुन, छोट्या छोट्या विठ्ठल रुक्मिणी बनलेल्या विद्यार्थ्यांकडून विठ्ठलाची आरती करण्यात आली. यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी अवघी शाळा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली होती. यास पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम , वैशाली पाटील मॅडम,राखी शर्मा मॅडम, विजय चौधरी सर, प्रमोद पाटील सर, उमेश पाटील, सखाराम पावरा यांनी प्रयत्न केले

