अमळनेरात रंगणार लोककलेचा लोकरंग; बालकलावंतांना मिळणार विचारपीठ , बालरंगभूमी परिषद व मराठी वाङ्मय मंडळाचा संयुक्त उपक्रम; ४ सप्टेंबरला लोककला प्रशिक्षण शिबिर
1 min read

अमळनेरात रंगणार लोककलेचा लोकरंग; बालकलावंतांना मिळणार विचारपीठ , बालरंगभूमी परिषद व मराठी वाङ्मय मंडळाचा संयुक्त उपक्रम; ४ सप्टेंबरला लोककला प्रशिक्षण शिबिर

Loading

अमळनेरात रंगणार लोककलेचा लोकरंग; बालकलावंतांना मिळणार विचारपिठ

बालरंगभूमी परिषद व मराठी वाङ्मय मंडळाचा संयुक्त उपक्रम; ४ सप्टेंबरला लोककला प्रशिक्षण शिबिर

अमळनेर प्रतिनिधी

मातीचा सुगंध, लोकजीवनाची स्पंदने आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेली संस्कृती यांचा मनोहारी संगम म्हणजे लोककला! आधुनिकतेच्या झंझावातात या लोकपरंपरांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी वर्ष २०२६ निमित्त लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोककला जपूया… संस्कृती रुजवूया…’ या प्रेरणादायी संदेशासह हे शिबिर ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मराठी वाङ्मय मंडळाच्या नांदेडकर सभागृह, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे.
बालमनातील कलागुणांना मुक्त अवकाश देतानाच लोककलेच्या विविध रूपांची ओळख करून देणे, त्यामागील सांस्कृतिक परंपरा समजून घेणे आणि नव्या पिढीत लोककलेविषयी आस्था निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. शिबिरातील सर्व सहभागी बालकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या उपक्रमातून पुढे ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ हा रंगारंग लोककला महोत्सव १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. बालकलावंतांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी या महोत्सवातून भव्य विचारपीठ उपलब्ध होणार आहे.
महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत गायन, एकल लोकगीत गायन, एकल लोकनृत्य आणि एकल लोकवाद्य वादन अशा विविध कला प्रकारांचा समावेश आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना स्मृतिचिन्हासह आकर्षक रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

‘चला उधळूया लोकरंग…!’ या सादेला प्रतिसाद देत अमळनेर परिसरातील बालकलावंत, पालक आणि कलाप्रेमींनी या सांस्कृतिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी संपर्क :

भैय्यासाहेब मगर – 94239 04483
संदीप घोरपडे – 94222 79710

अधिक माहितीसाठी :
सचिन महाजन – 76209 33294
मोहित पाटील – 90673 04797
हर्षल पवार – 88302 56068

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *