बी.आर्क. परीक्षेत पूर्वा राजपूतची उज्ज्वल भरारी; 8.11 सीजीपीएसह प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य  कळमसरेच्या कन्येने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष बी.आर्क. परीक्षेत घवघवीत यश मिळवत अमळनेरच्या शैक्षणिक मानात भर
1 min read

बी.आर्क. परीक्षेत पूर्वा राजपूतची उज्ज्वल भरारी; 8.11 सीजीपीएसह प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य कळमसरेच्या कन्येने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष बी.आर्क. परीक्षेत घवघवीत यश मिळवत अमळनेरच्या शैक्षणिक मानात भर

Loading

 

बी.आर्क. परीक्षेत पूर्वा राजपूतची उज्ज्वल भरारी; 8.11 सीजीपीएसह प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य

कळमसरेच्या कन्येने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष बी.आर्क. परीक्षेत घवघवीत यश मिळवत अमळनेरच्या शैक्षणिक मानात भर

भुसावळ प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) अंतिम वर्ष बी.आर्क. (2019 पॅटर्न) उन्हाळी सत्र 2026 च्या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील कु. पूर्वा देवेंद्र राजपूत हिने 8.11 सीजीपीए मिळवत प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य (First Class with Distinction) संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासह अमळनेर शहर आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पूर्वा ही पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची विद्यार्थिनी असून अंतिम वर्षातील प्रकल्पामध्ये तिने उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली. दहाव्या सत्रात तिने 9.00 एसजीपीए मिळवत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. आर्किटेक्चरल डिझाईन प्रोजेक्टमध्ये तिला ‘A’ ग्रेड, तर उद्योजकता विकास (Entrepreneurship Development) विषयात ‘O’ ग्रेड प्राप्त झाला आहे.
वास्तुकला क्षेत्रातील सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, सर्जनशीलता आणि जिद्दीच्या बळावर पूर्वाने हे यश संपादन केले आहे. तिची ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून भविष्यातही ती वास्तुकला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अभिनंदनाचा वर्षाव

पूर्वाच्या या यशाबद्दल जयदीप संजय जमादार, उमेश संजय जमादार (सुरत), वडील देवेंद्र रघुनाथ राजपूत (पूर्वा अँग्रो एजन्सीज व पूर्वा नर्सरी, कळमसरे), आई सौ. मनीषा देवेंद्र राजपूत (शिक्षिका), आजी-आजोबा, नातेवाईक, समाजबांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर, बळीराजा, शेतकरी पुत्र, कृषी पदविकाधारक, सल्लागार तसेच भुसावळ व कळमसरे परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *