अमळनेरची अमृता (दियाना) झेपावली भारतीय संघात!  ,अंडर-१५ भारतीय इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
1 min read

अमळनेरची अमृता (दियाना) झेपावली भारतीय संघात! ,अंडर-१५ भारतीय इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

Loading

अमळनेरची अमृता (दियाना) झेपावली भारतीय संघात!

अंडर-१५ भारतीय इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

अमळनेर प्रतिनिधी: अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी! येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री. वसंत राजधर पाटील यांची नात व श्री. मितेश पाटील यांची सुकन्या कु. अमृता (दियाना) मितेश पाटील हिची दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या १५ वर्षांखालील (अंडर-१५) इनडोअर क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमृता भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, तिच्या या निवडीने अमळनेरच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

जिद्द, मेहनत अन् चिकाटीची फलश्रुती!

लहान वयातच अमृताने आपल्या खेळातील गुणवत्ता आणि सातत्याच्या जोरावर स्वतंत्र ठसा उमटवला. कठोर मेहनत, वेळेचे नियोजन, जिद्द, सातत्य, प्रामाणिक कष्ट आणि कौशल्य आत्मसात करण्याची धडपड यामुळे तिने ही उल्लेखनीय झेप घेतली आहे.

अमृताच्या या यशामागे ग्लोबल स्कूलचे प्रिन्सिपल शिक्षक वृंद प्रशिक्षक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच आजोबा वसंत राजधर पाटील, वडील श्री. मितेश पाटील यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांचे तिला मोलाचे पाठबळ मिळाले.

“ही कन्या तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल” — ठरले भाकीत खरे!

अमृताच्या खेळाची चमक यापूर्वीच अनेकांच्या नजरेत भरली होती. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे सर, दादासाहेब शरद सोनवणे आणि आबासाहेब गोकुळ पाटील (माजी केंद्रप्रमुख) यांनी ३१ मे रोजी बक्षीस वितरणाच्या वेळी अमृताचा खेळ पाहून, “ही कन्या आई-वडिलांचे आणि अमळनेर तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल,” असा विश्वास व्यक्त केला होता. आज तिची भारतीय संघात निवड झाल्याने ते शब्द अक्षरशः खरे ठरले आहेत.

अमृताच्या या अभिमानास्पद यशाबद्दल अमळनेर तालुक्यातील क्रीडाप्रेमी, मान्यवर आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिच्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अमळनेरची ही ‘क्रिकेट कन्या’ आता भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय मैदानावर अभिमानाने उंचावण्यासाठी सज्ज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *