माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मनोजबापू पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट; स्व. सुधाताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली , स्व. दाजीबा पाटील यांच्या सहकार, सामाजिक व राजकीय कार्याचा मान्यवरांकडून गौरवपूर्ण स्मरण; अनेक आठवणींना उजाळा
![]()
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मनोजबापू पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट; स्व. सुधाताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्व. दाजीबा पाटील यांच्या सहकार, सामाजिक व राजकीय कार्याचा मान्यवरांकडून गौरवपूर्ण स्मरण; अनेक आठवणींना उजाळा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोज भाऊराव (मनोजबापू) पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय गं. भा. सुधाताई भाऊराव पाटील यांचे दि. २७ जून २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अमळनेर येथील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी विविध राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून दिवंगत सुधाताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सांत्वन भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. दाजीबा पर्वत पाटील यांच्या सार्वजनिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वशैलीसह सहकार चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानाच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
यावेळी सांगण्यात आले की, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती तसेच महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष म्हणून स्व. दाजीबा पाटील यांनी भारताच्या वस्त्रोद्योगाचे प्रतिनिधित्व करत जपान, रशिया आणि जर्मनी या देशांचा दौरा केला होता. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत राज्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पिताश्री सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि स्व. दाजीबा पाटील यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध, सहकार चळवळीतील योगदान आणि सार्वजनिक जीवनातील स्नेहपूर्ण आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी डॉ. सुधीर तांबे, मनोजबापू पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुलोचनाताई वाघ, शेतकी संघाचे चेअरमन संभाजी लोटन पाटील, नगरसेवक राजू दादा फाफोरेकर, जितेंद्र ठाकूर, हेमंत पवार, शत्रुघ्न पाटील, महेश पाटील, विश्वनाथ ठाकरे, भागवत सूर्यवंशी, जुबेर पठाण, तुषार संदानशिव, पी. वाय. पाटील, रऊफ पठाण, शिवाजी पाटील, सौ. गौरी शिंगणे, सुधीर वाघ, प्रताप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आणि स्वर्गीय सुधाताई भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

