साने गुरुजी विद्यालयाचा यशाचा चौकार; १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!
![]()
साने गुरुजी विद्यालयाचा यशाचा चौकार; १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता आठवीतील तब्बल बारा विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप परीक्षेत) उल्लेखनीय ऐतिहासिक यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यापूर्वी देखील एन. एम. एम. एस. परीक्षेत 16 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. स्कॉलरशिप सारख्या प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी 12 विद्यार्थींची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असल्याने संस्था, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गुणवत्ता यादीत मयूर गजानन पाटील हा विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकला आहे. तसेच जिल्हास्तरावर तो प्रथम आलेला आहे. तर मोहक साळुंखे, विराज पाटील, तपन पाटील, पार्थ पाटील, जयेश चौधरी, मोहित पाटील, हिमांशू मराठे, पियुष शिंदे, युगंधर पाटील, शिवम पाटील, सागर साळुंखे या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आपले स्थानपक्के केले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसाठी समावेश आहे. शासनाच्या नियमानुसार या सर्व विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती चा लाभ मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील व सर्व शिक्षकांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेने गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे तर प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील व प्राचार्य एस जे शेख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांमधून तपन पाटील व मयूर पाटील यांनी तर पालक प्रतिनिधी म्हणून गजानन पाटील यांनी संचालक प्रतिनिधी म्हणून प्राचार्य शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील सर यांनी केले. सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी तर आभार प्रदर्शन देवेंद्र पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

