संवेदनशील निर्णयाचा सन्मान; आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम
1 min read

संवेदनशील निर्णयाचा सन्मान; आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

Loading

संवेदनशील निर्णयाचा सन्मान; आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
राज्यातील अलीकडील दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिलदादा पाटील यांनी यंदा वाढदिवस कोणताही जल्लोष न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचा सन्मान राखत कार्यकर्त्यांनी केक कापणे, फटाके किंवा स्वागत सोहळ्यांऐवजी समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमपूर्वक भोजनाचे वाटप केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड यांनी सांगितले की, “समाजाप्रती असलेली बांधिलकी, सेवाभाव आणि माणुसकी जपण्याची प्रेरणा आम्हाला आमदार अनिलदादा पाटील यांच्या कार्यातून मिळते. त्यांच्याच विचारांतून प्रेरणा घेऊन हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.”
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे यांनी आमदार अनिलदादा पाटील यांना उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडत राहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
या उपक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे, ललित बाविस्कर, विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनीष देसले, उपाध्यक्ष हुझेफा पठाण, तालुका उपाध्यक्ष प्रणव चौधरी, युवक शहर कार्याध्यक्ष चैतन्य सनदाशिव, अंमळगावचे युवा नेते योगेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, सोशल मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी, प्रताप महाविद्यालय विद्यार्थी अध्यक्ष कुशन पाटील, विद्यार्थी सरचिटणीस तुषार ठाकरे तसेच यश पवार, समीर शेख, यश शेटे, अजय पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *