अमळनेरमध्ये काँग्रेसच्या संघटनाबांधणीला वेग; अनुसूचित जाती विभाग मजबूत करण्यावर भर , जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुश कटारे यांची तालुका काँग्रेस कमिटीला भेट; बूथनिहाय संघटनात्मक आढाव्यात महत्त्वपूर्ण चर्चा
1 min read

अमळनेरमध्ये काँग्रेसच्या संघटनाबांधणीला वेग; अनुसूचित जाती विभाग मजबूत करण्यावर भर , जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुश कटारे यांची तालुका काँग्रेस कमिटीला भेट; बूथनिहाय संघटनात्मक आढाव्यात महत्त्वपूर्ण चर्चा

Loading

अमळनेरमध्ये काँग्रेसच्या संघटनाबांधणीला वेग; अनुसूचित जाती विभाग मजबूत करण्यावर भर

जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुश कटारे यांची तालुका काँग्रेस कमिटीला भेट; बूथनिहाय संघटनात्मक आढाव्यात महत्त्वपूर्ण चर्चा

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्री. अविनाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात विविध विभागांच्या संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्री. अंकुश कटारे यांनी रविवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट देऊन संघटनात्मक कामाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी तालुक्यातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, बूथची संख्या, प्रत्येक बूथवर नियुक्त करण्यात आलेले बी.एल.ए. तसेच त्यांच्या वयोमानासह विविध संघटनात्मक बाबींची माहिती दिली. आगामी काळात बूथ पातळीपासून पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

अनुसूचित जाती विभागाच्या बांधणीवर विशेष भर

बैठकीत अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी हा प्रमुख चर्चेचा विषय ठरला. अनुसूचित जाती विभागाचे अमळनेर तालुका अध्यक्ष भगवान संधान शिव यांनी तालुका अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीच्या कामकाजाची तसेच संघटनात्मक परिस्थितीची माहिती अ‍ॅड. अंकुश कटारे यांना दिली.

यावेळी अनुसूचित जाती विभाग हा काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत विभागाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विचार पोहोचविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करून बूथनिहाय संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या बैठकीस जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, ठाकरे सर, अ‍ॅड. प्रशांत संदानशिव, सईद तेली, दिनेश पाटील यांनी सहभाग नोंदविला. तसेच अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस राहुल मोरे, अनिरुद्ध साळवे, राजेंद्र भोसले आणि अनंत बागुल यांचीही उपस्थिती होती.

याशिवाय तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राजू भाट, तसेच तुषार संधान शिव, प्रवीण पाटील, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळागाळातील संघटन मजबूत करण्याचा निर्धार

अमळनेर तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे अधिक प्रभावी करण्यासोबतच अनुसूचित जाती विभागाला सक्रिय करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी काळात समाजातील विविध घटकांशी संवाद वाढवून पक्ष संघटना अधिक व्यापक आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *